Home Latest Mohammad Shami’s identify really helpful for Arjuna Award Badminton gamers Satwik-Chirag in race for Khel Ratna Award

Mohammad Shami’s identify really helpful for Arjuna Award Badminton gamers Satwik-Chirag in race for Khel Ratna Award

0
Mohammad Shami’s identify really helpful for Arjuna Award Badminton gamers Satwik-Chirag in race for Khel Ratna Award

[ad_1]

Sports Award: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर या वेगवान गोलंदाजाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शमीने या स्पर्धेत सात सामन्यांत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला शमीचे नाव समाविष्ट करण्याची विशेष विनंती केली होती कारण मूळतः त्याचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते. ३३ वर्षीय शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, जिथे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारत दुसऱ्या स्थानावर होता. शमी पहिल्या चार सामन्यांत खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याने ५.२६च्या सरासरीने विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: KL Rahul: टीम इंडियात के.एल. राहुल नव्या भूमिकेत दिसणार, आयपीएलमध्येही मोठा बदल होऊ शकतो का? जाणून घ्या

अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंच्या नावांची शिफारस

शमीशिवाय अन्य १६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये पुरुष हॉकीपटू कृष्ण बहादूर पाठक आणि सुशीला चानू, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन, बुद्धिबळपटू आर वैशाली, गोल्फपटू दीक्षा डागर, नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, कुस्तीपटू अनंत पंघल आणि कुस्तीपटू अनंत पंघळे यांचा समावेश आहे.

शिवेंद्र सिंह यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाच जणांचे नामांकन करण्यात आले आहे. यामध्ये गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी) यांचा समावेश आहे. कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी) यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

हेही वाचा: AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग-११ जाहीर, ‘या’ दोन खेळाडूंना संधी

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकित:

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन).

अर्जुन पुरस्कारः मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि एम श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसमुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (शूटिंग), अनंत पंघल (गोल्फ). कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार: कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार: गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).

[adinserter block=”4″]

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here