[ad_1]
Crime News
|
Saam Digital
Crime News
दिल्लीतील टिळकनगरमध्ये एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर गुरप्रीत सिंह या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिला स्वित्झर्लंडची आहे. सदर महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा गुरप्रीतला संशय होता. म्हणून त्याने तीला भारतात बोलावून तीची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
टिळकनगरमध्ये एका विदेशी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत काही नागरिकांच्या नजरेस पडला होता. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिला ३० वर्षांची असून स्वित्झर्लंडची रहिवाशी आहे. तीन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाली होती.
या विदेशी महिलेचा खून कोणी केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला. टिळकनगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यातील एक फुटेज मृ्तदेह सापडलेल्या परिसरात शाळेच्या समोर असलेल्या घरासमोरील सीसीटीव्हीचे होते. फुटेजमध्ये ग्रे रंगाच्या कारमधून आलेला एक तरुण, मृतदेह शाळेच्या समोर फेकून देताना दिसत होता. पोलिसांनी कारचा नंबर ट्रेस केला आणि ही कार विदेशी महिलेच्या नावावर असल्याचे पोलिसांना समजले. कॉल डीटेल तपासल्यानंतर गुरप्रीतचे नाव समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावताना गुरप्रीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली.
गुरप्रीत आणि मृत महिलेची स्वित्झर्लंडमध्ये ओळख झाली होती. ही ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि त्यानंतर प्रेमात. गुरुप्रीत दर महिन्याला तीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला जात असे. काहीकाळानंतर त्या महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय गुरप्रीतला आला. त्यानंतर अत्यंत चालाखीने त्याने तीला आधी भारतात बोलावून घेतले. ती भारतात आल्यानंतर काहीतरी कारण काढून तो तीला एका रूममध्ये घेऊन गेला. तीच्यावर जादू करायची आहे असे सांगून तीचे हात-पाय बांधले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून मान्य केले आणि ती फसली. त्यानंतर गुरप्रीतने तीची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिलेने गुरप्रीतला लग्नाबाबत विचारले होते. त्यामुळे त्याने तीला फोन करून दिल्लीला बोलावले. १० ऑक्टोबरला महिला दिल्लीत पोहोचली आणि टागोर गार्डनच्या एका हॉटेलमध्ये थांबली होती. काही दिवस ती याच हॉटेलमध्ये राहिली. १७ ऑक्टोबरला गुरप्रीत हॉटेलवर पोहोचला. त्याने महिलेचे चेकआऊट केले आणि तीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. याठिकाणी त्याने तीची हत्या केली. गुरप्रीतने महिलेच्या खूनाचा प्लॅन आधीच बनवून ठेवला होता. कारण तो ज्या सेकंड हॅड कारमधून महिलेला घेऊन गेला ती कार त्याच महिलेच्या नावावर खरेदी केली होती.
(‘साम टीव्ही’चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महिलेच्या मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावायची या विचाराने गुरप्रीत खूपच घाबरला होता. त्यामुळे मृतदेह जनकपुरीतील बी-१ ब्लॉकवर कारमध्येच पडून होता. मात्र, कामधून दुर्गंधी येत असल्यामुळे गुरप्रीत कार घेऊन टागोर गार्डनला पोहोचला. इथे त्याने मृतदेह शाळेच्या भिंतीच्या मागे फेकून दिला. त्याचा हा कारनामा समोरच्या सीसीटीव्हीत कैद होत होत आहे याची साधी जाणीवही त्याला नव्हती.
पोलिसांनी शुक्रवारी गुरप्रीतला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. पोलिसांना त्याच्या घरातून पावणे दोन कोटी रुपये मिळाले असून गुरप्रीत पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आरोपीने खून करण्याआधी महिलेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहावर तशा जखमा आढळल्या असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
[adinserter block=”4″]
[ad_2]
Source link