[ad_1]
Diabetes, Weight Loss Helpful Kuttu ka Aata: जगभरात डायबिटीस, अतिवजन, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या वाढत असताना सुदैवाने लोकांची सतर्कता वाढत चालली आहे. यामुळेच अनेकजण कमी कार्बोहायड्रेट, कमी साखर, कमी सोडियम असलेल्या अन्नाच्या पर्यायांचा शोध घेत असतात. अगदी नियमित आहारात सुद्धा गव्हाच्या पिठाच्या जागी, पांढऱ्या तांदुळाच्या ऐवजी पर्याय शोधले हातात. आज आपण अशाच एका पर्यायाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे ते म्हणजे बकव्हीट (गव्हाचे). काही प्रदेशांमध्ये याला कुट्टूचे पीठ म्हणून ओळखले जाते. या पिठाचा वापर प्रामुख्याने उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी होत असे पण आज आपण या पिठाला नियमित आहारात स्थान देण्याची काही कारणे जाणून घेणार आहोत.
काहींना बकव्हीट बाबत अनेक संभ्रम असतात. मुळात कुट्टू म्हणजे बाजरी किंवा गहू नसून हे एक बियाणे आहे, पौष्टिक गुणधर्म त्याला एक सुपरफूड बनवतात ज्यामुळे असंसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळू शकते. अपोलो हॉस्पिटल्सच्या चीफ न्यूट्रिशनिस्ट डॉ प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनीसार या कुट्टूचे फायदे व वापर कसा करावा जाणून घेऊया..
कुट्टूच्या पिठाचे फायदे (Buckwheat Flour Benefits)
पोषक तत्वांनी समृद्ध
कुट्टुचे पीठ आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचा मुबलक साठा असल्याने हे पचनास विलंब करते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्याचा भास होतो, परिणामी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते आणि शरीराला सतत ऊर्जा प्राप्त होते. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे (बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, नियासिन, फोलेट आणि रिबोफ्लेविन), आणि खनिजे (मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि फॉस्फरस) असतात.
अँटिऑक्सिडंट्सचा मोठा साठा
कुट्टूच्या पिठात रुटिन, क्वेर्सेटिन आणि टॅनिनसह विविध बायोएक्टिव्ह संयुगे असतात, ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात आणि आजारांचा धोका कमी करतात.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
पारंपारिक गव्हाच्या पिठाच्या तुलनेत गव्हाच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा अर्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा सौम्य प्रभाव पडतो, ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा दिवसभर ऊर्जेची पातळी स्थिर ठेवू पाहणाऱ्यांसाठी ही एक अनुकूल निवड बनते.
हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य
कुट्टूच्या पिठामधील रुटिन रक्तवाहिन्या मजबूत करून हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करते. कुट्टूमधील मॅग्नेशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
पोटाचे आरोग्य
कुट्टूच्या पिठातील फायबर पचनास व आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते. विरघळणारे फायबर प्रीबायोटिक म्हणून काम करतात आणि आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.
वजन कमी करण्यासाठी मदत
कुट्टूच्या पिठात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते पण त्यात कॅलरीज कमी असतात यामुळे ते सहज पचते. यामध्ये ग्लूटेन नसल्याने पोषक तत्वांचे शरीरात शोषले जाण्याचे प्रमाण वाढते. चयापचय सुधारून फॅट्स बर्न होण्यासाठी सुद्धा मदत होते.
रोजच्या आहारात कुट्टूच्या पिठाचा समावेश कसा करता येईल?
कुट्टूचा हलवा: तुपावर कुट्टू भाजून घ्यावं. त्यात आंब्याचा रस, पाणी आणि मीठ घालून शिजवावं, साखर मिसळून शिजवावं, वेलची पूड आणि बदामाचे काप घालावे. रवा, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ या सगळ्यापासून बनणाऱ्या गोड पदार्थांना हा उत्तम पर्याय ठरतो.
कुट्टू नूडल्स (सोबा): कुट्टूच्या पीठापासून बनवलेले सोबा नूडल्स हे जपानी पाककृतीमधील मुख्य पदार्थ आहेत. अगदी चटपटीत चवीचे हे नूडल्स तुमच्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवू शकतात.
कुट्टू ब्रेड: कुट्टुपासून बनवलेले ब्रेड हे पांढऱ्या किंवा ब्राऊन दोन्ही ब्रेडच्या पर्यायांपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतात.
हे ही वाचा<< 30-30-30 नियम हा पोट, मांड्या व वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय! तज्ज्ञांनी सांगितलं कसा असावा दिवस?
कुट्टूचा भात: तांदूळ किंवा क्विनोआ प्रमाणेच शिजवलेले कुट्टू म्हणून भाज्या, कालवणासह खाल्ले जाऊ शकते.
[adinserter block=”4″]
[ad_2]
Source link